अठरा वर्षीय तरुणीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

 पिंपरी चिंचवड़ दि. ४सप्तेम्बर लोनावाला बहिनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी  बहिन व मैत्रिणी यांच्या समवेत आलेल्या 18 वर्षीय तरुणीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (3 सप्टेंबर) दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ध्वनी मनिष ठक्कर (वय 18, रा. पवई, कुर्ला मुंबई) असे या मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेची खबर ध्वनी हीची बहिन सुलोनी मनिष ठक्कर (वय 20) हीने लोणावळा शहर पोलिसांना दिली.

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली धरण परिसरात त्यांनी काम्याचा वाढदिवसाचा केक कापल्यानंतर त्या सर्वजणी पाण्यात उतरल्या धरणातील पाण्यात खेळत असताना अचानक ध्वनी हीचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात गेली.

यावेळी सुलोनी हीने तीला हात देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हात सुटल्याने ती खोल पाण्यात गेली. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी तीला पाण्यातून बाहेर काढले. मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने उपचारापुर्वी तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post