या वेळी पुणे मनपा व कैंटोमेंट निवडणुकीत आम आदमी पार्टी सुद्धा रिंगणात उतरणार.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :

पुणे, दि.३ आम आदमी पक्षाने पुणे महानगरपालिके बाबत  केली मोठी घोषणा, या वेळी आम आदमी पक्ष पुणे महापालिका निवडणुक लढवणार  असून पुण्यातील निवडणुकीची चुरस आणखीच रंगणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आता आम आदमी पार्टी सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आहे. आपच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेउन माहिती धीली, पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची जोरदार  घोषणा केली.

आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे म्हणाले,पुण्यासारख्या शहरात  आप ला चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल.आता आपची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल असंही राचुरे यांनी नमूद केलं.पुणेकरांच्या समस्या आधारित जाहीरनामा तयार केला जाईल, असं आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले.प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जनतेची फसवणूक, आप हा पर्याय जनता स्वीकारेल

आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले,पत्रकार परिषदेत पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत , संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post