पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित..... वाचा पूर्ण




प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

पिंपरी चिंचवड़ : दि ४ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्यासंदर्भात नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी  हे निर्देश दिले.

राज्य सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नियमांची अंमलबजावणी अद्याप सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी. तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकाला गुंठेवारी नियमित करायची इच्छा असेल तर त्यासंदर्भात सकारात्म कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील विविध विकास कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले.आढावा बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post