शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना औषधांचे वाटप राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : जयसिंगपूर-

2021 चा महापूर ओसरल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पूर बाधित गावांमधील नागरिकांसह लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या या संपूर्ण काळात राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून फिरत्या मोबाईल रुग्णवाहिके मधून आरोग्यसेवा गावोगावी जाऊन दिली होती, त्यानंतरही या सर्व भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत या हेतूने राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शनिवारी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्राना औषधांचा पुरवठा करण्यात आला,

यामध्ये लहान मुलांसाठी सर्दी,खोकला, ताप तसेच इतर सर्व आजारांवरील त्वचारोगा सह प्राथमिक स्वरूपातील आजारांवरील सर्व औषधांचा समावेश आहे, शिरोळ तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाखरे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध निर्माण अधिकारी श्री. हाके यांच्यासह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post