ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड शहर अध्यक्षपदी विजय पवार तर उपाध्यक्षपदी दीपक मधुरकर यांची नियुक्ती

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली नजीर शेख : 

पुणे : ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड संघटनेची कार्यकारणी गुरुवारी नव्याने जाहीर करण्यात आली. ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देहूरोड येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड शहर अध्यक्षपदी विजय पवार तर उपाध्यक्षपदी दीपक मधुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर मावळ तालुका उपाध्यक्षपदी रज्जाक शेख आणि संघटकपदी प्रशांत जोगदंड यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्वांना , एम.डी.चौधरी ,जेष्ठ पत्रकार अशोक कंबळे , रमेश कंबळे यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आली.

  या प्रसंगी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे  श्याम चौहान , सिद्धार्थ कांबळे ,प्रथमेश ओव्हाळ , सुशांत जोगदंड ,सागर मधुरकर ,सुमित गायकवाड ,सिद्धार्थ सूर्यवंशी , सचिन वाघमारे, राजकुमार यादव ,रमेश चलवादी ,साकीब शेख, विजय लोंढे , धर्मपाल कांबळे , चोपडे ,आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post