कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्या संदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई-

कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या ज्या शहर व गावांमध्ये कमी आहे अशा ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची बुधवारी सकाळी भेट घेतली व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची विस्तृत माहिती देताना व्यापारी वर्गासमोर व्यवसाय बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी ही मांडल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व शहरांमधील तसेच ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत असल्यामुळे हा सर्व व्यापारी वर्ग अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याचे ही राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले व संबंधित व्यापाऱ्यांचे व्यवसाय शासनाच्या अटी व शर्तीसह सुरू करण्यासाठी  आपण प्रशासनाला आदेश द्यावेत अशी विनंतीही केली, या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना व्यापाऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात तातडीने आदेश दिले असून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण ज्या ठिकाणी कमी असेल अशा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून लवकरच आदेश पारित होतील असेही शेवटी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post