अब्दुल लाट येथे गावकऱ्यांनी मोफत कोविड सेंटर सुरू केले , सर्वांनी या गावाचा आदर्श घ्यावा. जिल्हाधिकारी दौलत देसाई

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अब्दुल लाट गावकऱ्यांच्या दातृत्वा तून गावातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते गटातटाचे राजकारण बाजूला ठेउन गाव करील ते राव काय करील, या उद्देशाने जनसेवा हीच प्रभु सेवा या तत्वावर एकत्रित येऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गोरगरीब रुग्णांची सोय व्हावी म्हणून मोफत कोविढ उपचार सेंटर सुरू केले. या कोविढ सेंटरला , अंटीजन टेस्ट साठी शासनाकडून 500 देत आहोत , गावकर यांचे मनापासून अभिनंदन करीत आहे, नागरिकांनी मास्क लावावे , सॅनिटायझर चा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग से पालन करावे असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सदिच्छा भेट दिली असता म्हणाले.

   याप्रसंगी प्रांताधिकारी विकास खरात , तहसीलदार अपर्णा मोरे , आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार , शरद चे संचालक एस के पाटील , जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे , चैतन्य शिक्षण समूह संस्थापक डॉक्टर दशरथ काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, डॉक्टर भूषण दादासो यमाटे, प्राचार्य शरद काळे, शरद पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post