लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे : लोकशाहीर गफूरभाई पुणेकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कलाकारांचा जाणता राजा लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम ,  वृक्षरोपण , अनाथ मुले व वृद्ध नागरिकांसाठी मनोरंजनपर गीतांचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११. जुन २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शंभूराजे अनाथालय,  तुकाई दर्शन पोलीस चौकी शेजारी काळे पडळ हडपसर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अध्यक्ष- महा.प्रदेश, अल्पसंख्यांक सेल पार्टी ऑफ इंडिया ( आ) आ. आयुब भाई शेख , अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले ,  पुणे मनपा नगरसेवक मा. धीरज भाऊ घाटे , आ. आनंद पिंपळकर ( आनंदी वास्तू ),  मा. मारुती आबा तुपे नगरसेवक पुणे मनपा , मा. संजय भाऊ आल्हाट अध्यक्ष पुणे शहर लोक जन शक्ती पार्टी , मा. उमेश चव्हाण संस्थापक रुग्ण हक्क परिषद , मा. लक्ष्मीकांत खाबिया कार्याध्यक्ष महा कला मंडल.  हजर राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post