शेतमजुर बांधकाम व रोजंदार कामगारांना अनुदान द्या - आर. आर. पाटील.


ओमकार पाखरे/ शिरोळ तालुका प्रतिनिधी

 

  कुरुंदवाड :  कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी सुरू असल्याने शेतमजूर, बांधकाम कामगार व रोजंदार कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर राज्यांनी कामगारांना ३ रू. प्रतिकुटुंबांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही प्रत्येक कुटंबाला ५ हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी लायन्स क्लबचे संचालक आर.आर.पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post