पुणे पोलिसांकडूनही मान्सूनपर्व तयारीला सुरूवात करण्यात आली



 पुणे :  20 :  शहरात मागील दोन वर्षात झालेल्या पावसामुळे पुणे पोलिसांकडूनही मान्सूनपर्व तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. मान्सूनच्या काळात आत्पकालिन परिस्थिती निर्माण झाल्यास कसे काम करायचे याची तयारी करण्याच्या सूचना प्रशासनाने सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. त्याशिवाय धोका असणाऱ्या ठिकाणांची माहिती देण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.

मुसळाधार पावसामुळे इमारतीच्या संरक्षक भिंती, घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत. काही वेळा पूर येऊन जिवीत व वित्त हानी देखील झाली आहे. तसेच, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेक भागात पाणी शिरते.अनेक पुल देखील पाण्याखाली जातात. रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होती. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाप्रमाणेच पोलिसांनी देखील मान्सूनपर्व तयारी सुरू केली आहे. त्यासंदर्भातील सर्व माहिती गोळा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. माहिती गोळा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने त्यांच्या वरिष्ठ व गुन्हे निरीक्षकांच क्रमांक, पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व त्यांना पोहता येणारे पाच कर्मचारी, हद्दीतील पोहता येणारे खासगी व्यक्ती, शोध व बचाव कार्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता याची पूर्व तयारी करण्याच्या सूचना पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत

पोलिस ठाण्यांना सूचना

  • शहरात आत्पकालिन परिस्थिमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी
  • आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक, पत्ते याची यादी तयार करावी
  • शोध आणि बचाव कार्यासाठी पुरेशा साधानांची उपलब्धताबाबत पूर्व तयारी करावी
  • अतिवृष्टीमुळे झाडे पडून वाहतूक कोंडी होणे, विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यावेळी पर्यायी रस्त्याबाबत उपाययोजना करणे
  • आपत्तीच्या काळात जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे.
  • बाधित झालेल्या भागात स्थाव मालमत्ता व मौल्यवान गोष्टीवर देखरेख
  • नदीपात्रातील झोपडपट्टया व धोकादायक ठिकाणाचा अभ्यास करून योजना कराव्यात.
  • नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी.
  • आपत्तीच्या काळात शोध व बचाव कार्यासाठी स्वतंत्र गटाची व्यवस्था करावी
  • धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून प्रवेश बंद करावा

Post a Comment

Previous Post Next Post