येत्या शनिवारपासून (दि.22) परवानाधारक रिक्षाचालकांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.



 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करतानाच राज्य सरकारने रिक्षा परवानाधारकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. याबाबत प्रणाली तयार करण्यात आली असून येत्या शनिवारपासून (दि.22) परवानाधारक रिक्षाचालकांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.



कोरोनामुळे वेळोवळी लॉकडाऊन लावण्यात आल्याने विविध व्यवसाय ठप्प झाले. रिक्षाधारकांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. यातच वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 13 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावेळी राज्य शासनाने विविध घटकांना अनुदान जाहीर केले असून, यात रिक्षा परवानाधारकांचादेखील समावेश आहे.याबाबत परिवहन विभागाने सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना आपले बँक खाते लिंक करण्याचे आवाहन केले होते. यामुळे रिक्षा परवानाधारकांना थेट खात्यात अनुदान मिळणे सुलभ होणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने सदर रक्कम जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रणाली विकसित करण्यात येत होती. यानूसार आयसीआयसीआय बँकेमार्फत प्रणाली विकसीत करण्यात आली असून येत्या शनिवारपासून परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. राज्यात 7 लाख 20 हजार परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

रिक्षा परवानाधारकांच्या खात्यावर येत्या शनिवारपासून अर्थिक मदत जमा होणार आहे. याबाबत प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याठिकाणी अचूक माहिती भरल्यानंतर तात्काळ खात्यावर रक्कम जमा होईल. - डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

Previous Post Next Post