पुणे : 24 तासांत करोनाचे 4 हजार 103 नवीन रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 2 हजार 77 रुग्णांना डिस्चार्ज

 


पुणे - शहरात मागील 24 तासांत करोनाचे 4 हजार 103 नवीन रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 2 हजार 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहरात तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; त्यापैकी 35 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 849 झाली असून, गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी 825 गंभीर रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, 3 हजार 403 रुग्णांना ऑक्‍सिजनवर ठेवले आहे.शहरामध्ये आतापर्यंत 2 लाख 73 हजार 446 नागरिकांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 2 लाख 32 हजार 260 रुग्ण बरेही झाले आहेत. तर, 5 हजार 337 जणांचा मृत्यू झाला आहे.

एका दिवसांत 20 हजारांपेक्षा जास्त स्वॅब टेस्ट :

मागील 24 तासांत तब्बल 20 हजार 681 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

Post a comment

0 Comments