covid-19 काळामध्ये मृत्यू पावलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये व अपघाती मृत्यू पावलेल्या कामगारांना पाच लाख रुपये मिळणार!हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

मागील वर्षाच्या सुरू झालेल्या लॉक डाऊन पासून सप्टेंबर २०२० मध्ये राज्यातील बहुसंख्य  कामगारांच्या संघटनांनी एकत्रित येऊन बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबई बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय बांद्रा येथे प्रचंड मोर्चे काढून मागण्या करण्यात आलेल्या होत्या. त्यातील काही मागण्यांची अंबलबजावणी व पूर्तता covid-19 साथीमध्ये कामगारांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली आहे. (१) मागणी अशी करण्यात आली होती की, एक एप्रिल दोन हजार वीस पासून ज्या बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रांचे नूतनीकरण करण्याची मुदत संपली असल्यास अशा कामगारांचा कोरोनाने मृत्यु झाला असल्यास किंवा अन्य कारणाने अगदी नैसर्गिक मृत्यू जरी झाला असल्यास अशा कामगारांची जरी त्यांच्या ओळखपत्रांचे  नूतनीकरण झालेले नसेल तरी त्यांना कल्याणकारी मंडळाचे सर्व लाभ देण्यात यावेत.त्यामुळे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत ज्या नोंदीत कामगारांचा मृत्यू झालेला आहे अशा कामगारांच्यां पैकी ज्यांचा अपघाती मृत्यू झाले असल्यास त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये व नैसर्गिक मृत्यू झाले असल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळतील. तसेच दरमहा 2 हजार रुपये आर्थिक मदत व अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तरी या बाबत संबंधित मृत्यू पावलेले जे कामगार असतील त्यांच्या वारसांनी व संघटनांनी लाभ मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावेत. असे आवाहन कामगार संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.   

(२) कल्याणकारी मंडळामार्फत असाही निर्णय करण्यात आलेला आहे की,नोंदीत बांधकाम कामगारांच्या पहिली ते दहावी शिक्षण घेणाऱ्या  पाल्यांना शिष्यवृत्ती योजना मागणी अर्ज देत असताना त्यांना शाळेत 75 टक्के उपस्थिती बाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागत असे. परंतु ही अट मंडळाने शितील केलेली आहे. (तीन) लॉक डाऊन काळामध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली नाही ते बांधकाम कामगार अजूनही दोन + तीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये मिळण्यासाठी मागणी करू शकतात. वरील काही मागण्याची पूर्तता अंमलबजावणी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून सुरू करण्यात आलेली आहे त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. परंतु ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केले आहेत त्यांना लाभ देण्याची ऑनलाइन प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे त्यामुळे बांधकाम कामगार मिळणाऱ्या  लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणूनच ज्या कामगारांनी लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत व ज्या बांधकाम कामगारांचे अर्ज संबंधित जिल्ह्यातून स्कॅनिंग करून मुंबई कल्याणकारी मंडळाकडे पाठवण्यात आलेले आहेत .त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांनी कल्याणकारी मंडळाकडे केलेली आहे.याबाबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार संघटनांनी सर्व प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर होऊन कामगारांना लाभ देण्याबाबत आंदोलनासहित सर्व मार्गाने प्रयत्न करावेत. *असे पत्रक कॉ शंकर पुजारी  महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक यांच्या वतीने प्रसिद्धीस दिले आहे*.

Post a comment

0 Comments