यड्राव सहकारी बँकेने १०१ कोटी ठेवीचा टप्पा केला पारजयसिंगपूर-

सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी १९९५ स्थापन केलेल्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने नुकतेच १०१ कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून बँकेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते संचालक मंडळांमधील सदस्य अधिकारी व कर्मचारी यांनी केक कापून हा आनंद साजरा केला,

आपल्या परिसरातील शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी उद्योजक, बेरोजगार तरुण यांना अर्थसहाय्य करता यावे व हे सर्व घटक स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने सहकार महर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांनी या बँकेची स्थापना केली होती असे सांगताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेच्या काळात बँकेचे सभासद, ठेवीदार,विश्वस्त अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे ठेवीचे उद्दिष्ट पार पाडण्यात यश आल्याचे सांगितले, भविष्यात देखील बँकेची विश्वासार्हता आणखी दृढ केली जाईल शाखाविस्तारासह व्यवसाय वाढीसाठी  सुद्धा प्रयत्न केले जातील असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले,

जयसिंगपूर प्रधान कार्यालयासह कुरुंदवाड, दत्तवाड, यड्राव व नरंदे या शाखांमधून बँकेने १६१ कोटीचा व्यवसाय केला असून जवळपास ६० कोटी कर्जाचे वाटप केले आहे, बँकेचा एनपीए शून्य टक्के असून आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी ५९ लाख ढोबळ नफा तर ७५ लाख निव्वळ नफा झाला आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी यावेळी दिली,

यावेळी दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी यांच्यासह बँकेचे संचालक संजय पाटील यड्रावकर, दादासो पाटील चिंचवाडकर, संभाजी मोरे, भरत चौगुले, सौ बबीता बेळकुडे, असलम फरास, प्रताप आगरे, आदित्य पाटील-यड्रावकर, तज्ञ संचालक सचिन देशिंगे ऑडिटर विद्यासागर बस्तवाडे, डेवलपमेंट ऑफिसर भुपाल सुतार, विजय खोत यांच्यासह बँकेचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments