पुणे : लाॅकडाऊन तीन एप्रिल रोजी सुरू, सायंकाळी सहानंतर पुण्यातील बहुतांश बाजारपेठा, रस्ते सामसूम .



 पुणे :  कोरोनाचा उद्रेक पुणे शहरात अनुभवास येत आहे. काल चोवीस तासांत साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे पुण्यातील अंशतः लाॅकडाऊन तीन एप्रिल रोजी सुरू झाला असून सायंकाळी सहानंतर पुण्यातील बहुतांश बाजारपेठा, रस्ते सामसूम झाल्याचे चित्र दिसून आले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरले होते. पहिल्या दिवशी कारवाई करण्याऐवजी नागरिकांना समजावून सांगण्यावर भर देण्यात येत असल्याचे गुप्ता ओळखपत्र नसणारे घरेलु कामगार, असंघटीत कामगार तसेच रात्रीच्यावेळी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत कुठलीच स्पष्टता करण्यात आलेली नाही. तरीही संबंधित घटकांना त्रास होणार नाही, त्यांचाही संवेदनशीलतेने विचार करून योग्य दखल घेतली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचा इशारा ओळखपत्र नसणारे घरेलु कामगार, असंघटीत कामगार तसेच रात्रीच्यावेळी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत कुठलीच स्पष्टता करण्यात आलेली नाही. तरीही संबंधित घटकांना त्रास होणार नाही, त्यांचाही संवेदनशीलतेने विचार करून योग्य दखल घेतली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

शहरात ठिकठिकाणी बॅरीकेडस लावून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरीकांची चौकशी केली जात होती. त्याच पद्धतीने काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः नागरीकांना थांबवून त्यांची चौकशी करून सोडले.ओळखपत्र, कंपन्यांचे पत्र, आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगावीतरात्री शहरातुन ये-जा करणाऱ्या कामगारांनी त्यांचे कंपन्या, आस्थापानांचे ओळखपत्र किंवा त्यांनी दिलेले पत्र स्वतःजवळ ठेवावे. तसेच वैद्यकीय,प्रवास किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बाहेर पडताना वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत. त्यांची पोलिसांकडून अडवणूक होणार नाही.

प्रवाशांसाठी रात्रीच्या वाहतुक व्यवस्थेचे काय ?
रात्रीच्यावेळी शहरात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना घरी किंवा इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था कशी असणार आहे, हा प्रश्‍न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे वैध कारण तपासले जाईल. त्यांच्याकडे प्रवासासाठीचे योग्य कारण, बस तिकीट, अन्य कागदपत्रे पाहिली जातील. रात्रीच्यावेळी अडकलेल्या प्रवाशांना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सुचना पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांना दिल्या आहे. त्यांच्यामार्फत संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले आहे. "वेळप्रसंगी पोलिस स्वतःच्या वाहनांमधून नागरीकांना पोचवतील' असे डॉ.शिसवे यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरले होते. पहिल्या दिवशी कारवाई करण्याऐवजी नागरिकांना समजावून सांगण्यावर भर देण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post