धोबी परीट समाज्या तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन.



इचलकरंजी : आनंद शिंदे.

22 मार्च 2019 आपल्या देशात पुर्णपणे लॉक डॉऊन करण्यात आले त्या दिवशी पासून आमच्या धोबी परीट समाजावर फार मोठा आघात झाला आहे.

या महाभयंकर कोरोना रोगाने धोबी समाजच्या बंधू वर फार मोठे संकट उभे ठाकले आहे या महा भयंकर रोगाचा भीतीने सर्व लॉन्ड्री व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे.या संकट काळी ठाकरे सरकार काही तर मदत करेल अशी मोठी आशा होती परंतु ती देखील मदत मिळाली नाही ॽ मुख्य मंत्री ठाकरे साहेब आपण तर आठवडा तून फक्त आणि फक्त शनिवारी व रविवारी दिवसभर पुर्णपणे बंद व इतर पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जीवन आवश्यकता दुकाने चालू परंतू त्या देखील आमच्या लॉन्ड्री व्यवसाय बसत नाही. कारण आमचे ग्राहकांच्या बरोबर थेट संबंध येता. ‌ म्हणून आम्ही पोटाला काय खायचे व मुलं बाळांना कसं जगव्यायाच हा मोठा  गंभीर प्रश्न डोळ्यासमोर सारखा उभा राहातो.

या कोरोना व लॉकडाउनमुळे धड जगात येईना आणि उपाशीपोटी मरता येईना इकडे आड तिकडे विहीर अशी धोबी समाजचे  परिस्थिती झाली आहे.आम्ही या जगात जगायाचे कसं हि आमच्या समोर फार मोठी समस्या उभी झाली आहे काय करावे काय नको असा प्रश्न पडला आहे. 

मुख्यमंत्री साहेब आता प्रत्यके राज्य मध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत त्याच बरोबर इतर राज्यांच्या निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आपले देशांचे पंतप्रधान श्री मोदी साहेब अचानक कधी एका रात्रीत मोठ्या लॉक डाऊन करतील याचा नेम नाही म्हणून आम्ही आपणास निवेदन दारा विनंती करीत आहोत की इतर कामगार रिक्षा चालक आणि इतर घटक ना जसे  मदत जाहीर केलात आहे आम्ही धोबी समाज व बारा बलुतेदार जाती जमाती ना  देखील आशा प्रकारचे मदत मंजूर करून ते लवकर त लवकर मिळावी.अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर  प्रकाश शिंदे , सुभाष परिट, निवास परीट, राजू शिंदे दिलीप शिंदे, रविंद्र परीट, पत्रकार आनंद शिंदे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post