हुपरी मध्ये लॉक डाऊनचा फज्जा उडाला. हुपरी नगरपरिषदेचे ढिसाळ नियोजन





वार्ताहर

हुपरी :   लॉकडाऊन जाहीर,आठवडी बाजार रद्द पण इतर दिवशी असा भरगच्च बाजार भरतो की नगरसेवकांचे लक्ष नाही. नगरपालिकेचे लक्ष नाही. किती कोरोना पाॕझिटिव्ह फिरुन जातात किती जणांशी संपर्क येतो कुणास काय समजणार. समुह संसर्गाचा धोका होण्याची भिती आहे. फक्त गावातील शेतकरी किंवा व्यापारी चालतील पण बाहेर गावातील व्यापारीही बेधडक व्यापार करत आहेत. ना मास्क वापरत आहेत.. ना सोशल डिस्टन्सेस... कुठे आहे प्रशासन त्यांना हे दिसत नाही का? जेथे गरज आहे तेथे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारी दवाखान्यातही कोरोना  लस घेण्यासाठी वयोवृद्ध जात आहेत पण तेथे नियोजनाची वानवा आहे. लोक दिवसभर उन्हात थांबतात ते पण गर्दी करुन रांगेत.ना सोशल डिस्टंन्सेस ना मास्क. तरीही लक्ष नाही,नागरीकहो आता आपणच आपली काळजी घ्या..

Post a Comment

Previous Post Next Post