नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई दि. 30 - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला  देण्यात यावे अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची ;आंबेडकरी जनतेची मागणी असून या मागणी चे पत्र आपण केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पाठविणार आहोत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय  विमानतळाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाविकास आघाडी सरकार ने मंजूर करावा अशी मागणी करणार आहे.

मुंबईत व्हिटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस; मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले त्या नामांतराचे आम्ही स्वागत केले आहे.तसेच मुंबई  ते नागपूर  समृद्धी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब  ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्या निर्णयाचे आम्ही सांगत केले आहे.नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमनताळला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची आणि आंबेडकरी जनतेची मागणी आहे. 

भारतीय संविधानाचे शिल्पकार; जागतिक स्तरावर समतेचे ;मानव अधिकार चळवळीचे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महनीय प्रेरणादायी व्यक्तिमत्व प्रज्ञासूर्य म्हणून ओळखले जातात. त्यांचे मुंबई कोकण आणि परिसर हा कर्मभूमी राहिला आहे.त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घ्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी आज केली आहे.  



           

Post a Comment

Previous Post Next Post