दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले पिंपरी - शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत असून खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु खासगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची अडचण होत आहे.  खासगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. यासंदर्भात, दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहेत.शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांच्या दालनात महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर नानी घुले, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी करोना रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या, महापालिका रुग्णालये, शासकीय रुग्णालये, खासगी हॉस्पिटलमधील करोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासह इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचा डॅशबोर्ड अपडेट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच महापौरांनी करोनावर मात करण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन त्याची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेशही दिले

Post a comment

0 Comments