एमएच 12, एएन 6059) या चारचाकीत अंदाजे 35 ते 40 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला, मृत्यू की घातपात आहे? हे अद्याप स्पष्ट नाही.सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ (एमएच 12, एएन 6059) या चारचाकीत अंदाजे 35 ते 40 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती समजल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अद्याप मृत युवकाची ओळख पटली नाही. दरम्यान, तरुणाचा नैसर्गिक मृत्यू की घातपात आहे? हे अद्याप स्पष्ट नाही.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ सांगलीच्या दिशेने तोंड असलेल्या मोटारीत आज दुपारी एका युवकाचा मृतदेह सापडला. चारकीत पुढे आणि मागे "प्रेस' अशी अक्षरे लिहिली आहेत.तसेच मृत तरुण चालकाशेजारी असलेल्या सीटजवळ मोटारीतील डॅशबोर्डवर पाय टाकून मृतावस्थेत आढळून आला. चालकाच्या सीटवर विस्कटलेल्या अवस्थेतील उशी मिळाली असून, तेथेच एक चप्पल जोड आढळली आहे. तरुण मृत होऊन बारा तासांपेक्षा जास्त कालावधी झाल्याचे सांगण्यात आले.


काल सायंकाळी ही मोटार त्या परिसरात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप समजले नाही. त्याची ओळखही पटली नाही. माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे.

Post a comment

0 Comments