तारदाळ येथील शिक्षक विजयकुमार मल्लू खोत यांना आदर्श शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान.

 . 
   

 हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

                  

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील सन्मती विद्यालयाचे शिक्षक श्री .विजयकुमार मल्लू खोत यांना विजयालक्ष्मी सोशल फाऊंडेशन सोलापूर यांचे वतीने या वर्षीचा आदर्श शिक्षणरत्न राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार बेळगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

      या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक , राजकीय , शैक्षणीक , क्षेत्रात उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. विविध शैक्षणिक प्रयोग व उपक्रमाद्वारे  शाळेतील व समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी विजयकुमार खोत हे प्रचंड मेहनत घेत आहेत . शिक्षण क्षेत्रात त्यांनी करत असलेले अविरत परिश्रम, महत्वपूर्ण बदल व देत असलेले योगदान यामुळे सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेसाठी श्री विजयकुमार खोत सर आदर्श ठरले आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञात व प्रेम व्यक्त करण्यासाठी फाऊंडेशनतर्फे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन विजयकुमार खोत यांना विविध मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षणरत्न पुरस्कार मिळाले बद्दल खोत सरांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे .

Post a comment

0 Comments