- हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू



पुणे : - हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विक्रेत्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे (मंगळवार, दि. ३०) समोर आले. रुग्णाला (सोमवारी, दि. २९) सकाळी ११ वाजता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांची तपासणी केली असता, ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले, असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले.नारायण शेलार (वय ७०, रा. रामोशी आळी, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

शेलार यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलांनी हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्यावेळी त्यांची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह दरम्यान, रुग्णाचा पत्नी त्यांच्याबरोबर होती. त्यानंतर त्यांचे नातेवाईक रात्री ९.३० च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी रुग्णाची परिस्थिती क्रिटीकल झाल्याचे हॉस्पिटलने सांगितले. रुग्णाला उपचारासाठी दाखल करावे लागेल किंवा ससूनला न्यावे लागले. आमच्याकडे व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. त्यानंतर नातवाईकांनी रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असूनही ससून रुग्णालयात न नेता घरी नेले. दरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाल्यावर फॅमिली डॉक्टरांना बोलावले. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णाचा अ‍ॅटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही सह्याद्री हॉस्पिटल, फॅमिली डॉक्टर आणि नातेवाईकांनी नागरिकांना का वेठीस धरले असा संतप्त सवाल हडपसरवासियांनी उपस्थित केला आहे. कोविड पॉझिटिव्ह असून, रुग्णालयाने त्यांना बाहेर का सोडले, त्यांच्यावर नियमानुसार उपचार का केले नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

दरम्यान, ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ॲडमिट करण्याची व्यवस्था नसल्याचे माहित होते. तरीसुद्धा पेशंट तातडीनं हलवा असे सांगून रात्री 1.30 सुमारास रुग्णाला रुग्णालयातून बाहेर का काढण्यात आले. नागरिकांना मृत व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानेतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने माहिती देण्यास नकार दिला. 

Post a comment

0 Comments