भरमसाठ व्याज खात एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी सावकारावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.



 सासवड - वीर (ता. पुरंदर) येथील एका बेकायदेशीर सावकाराने भरमसाठ व्याज खात गावातीलच एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी सावकारावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याशिवाय अजून दोन तरुण या सावकाराच्या जाचात अडकल्याचे प्रकरण पुढे येत आहे. त्यातील एका तरुणाला तर चक्‍क गाव सोडून जावे लागल्याचे समोर आले आहे.

रुपेश रत्नसिंह धुमाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. तर अमित नंदकुमार केंद्रे (वय 33 रा. वीर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 13 मे 2015मध्ये अमित यांच्या कारचा अपघात झाला होता.त्यामध्ये त्यांचे आई, वडील, मामा, मामी जबर जखमी झाले होते. त्यांच्या उपचारासाठी 16 लाख रूपये खर्च आला होता. तो खर्च भागविण्यासाठी अमित यांनी दि. 26 जून 2015 रोजी धुमाळकडून 10 टक्‍के व्याजाने 3.5 लाख रूपये घेतले होते. त्याबद्दल्यात अमित दर महिन्याला 35 हजार रुपये व्याज रुपेशला देत होता. दि.25 फेब्रुवारी 2017 रोजी रुपेशच्या सांगण्यावरून अमितने मयूर साळुंखे यांना 3. 5 लाख रुपये रोख आईसमक्ष दिले. त्यानंतर मयूर जून 2017 पर्यंत रुपेशला व्याज देत होता.

कर्ज अधिक झाल्याने तो दि. 19 जून 2017 रोजी गावातुन पळून गेला. त्यामुळे मयूरला दिलेले पैसे रुपेश अमिलताच मागू लागला. यावर मयूर आणि रुपेश यांचा व्यवहार आहे, मी पैसे देणार कसे, असा सवाल अमित यांनी करताच रुपेशने त्यांचा गळा दाबला आणि सुरीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यातून भितीपोटी 2019 पर्यंत दरमहिना 35 हजार व्याज अमितने दिले. त्याचवेळी अमित यांनी यात्रेनंतर बाकी पैसे देतो, असे सांगितले. रुपयेश पैशांसाठी घरीही आला, त्यावेळी दवाखान्याचे कारण सांगून समजूतीने घेण्याची अमितच्या वडिलांनी विनंती केली. मग स्वाक्षरी करुन घेऊन अमितकडून पाच कोरे धनादेश घेतले. त्यानंतही काही दिवसात अमितने धुमाळ यास दोन लाख रुपये परत केले.

दरम्यान, अमितचा मित्र नितीन चवदरी (रा. वीर) याने 2017 मध्येच रुपेशकडून 13 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याने डिसेंबर 2019 पर्यंतव्याज दिले, त्यानंतर तो व्याज देऊ शकला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post