बॅंकांच्या खातेदारांचा गोपनीय डेटा चोरी आणि विक्री प्रकरणी रोहन मंकणी' याला पुणे सायबर गुन्हे शाखेकडून अटकमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते 'रवींद्र मंकणी' यांच्या मुलाला म्हणजेच, 'रोहन मंकणी' याला पुणे सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. बॅंकांच्या खातेदारांचा गोपनीय डेटा चोरी आणि विक्री प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच रोहन मंकणी व्यतिरिक्त अन्य ९जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ३७ वर्षीय रोहनला सायबर पोलिसांनी २५ लाखांची लाच घेताना अटक केली रवींद्र मंकणी हे मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारे उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी अनेक उत्कृष्ट मालिकांमध्ये काम केलं आहे. रवींद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या तर अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देखील साकारल्या आहेत.

मात्र, सध्या तरी या १० जनांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पुणे सायबर विभागाच्या पोलिसांचं हे मोठं यश मानलं जात आहे. कारण या कारवाईत पोलिसांनी भारतीयांचे तब्ब्ल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवलं आहे. रोहन हा पुणे शहराचा भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आहे..

Post a comment

0 Comments