वाळू तस्करी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल , अद्यापही चार आरोपी फरार
पुणे  : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे पोलिसांनी अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. यात 21 वाळू तस्करी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय 17 वाळू तस्कऱ्यांना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र अद्यापही चार आरोपी फरार आहेत.

आज भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाळू साठा करण्यासाठी लागणाऱ्या चार फायबर बोटी व 2 हायड्रोलिकच्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जिलेटीनच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार दत्तात्रेय जाधव, पोलीस हवालदार इन्कलाब पठाण, पोलीस नाईक समीर करे यांच्या पथकाने कारवाईउजनी जलाशयातील वाळू चोरी प्रकरणात आतापर्यंत इतकी मोठी कारवाई झाली नव्हती. मात्र या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

खरं तर उजनीधरण हे पुणे-सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. यावर हजारो हेक्टर कोरडवाहु शेतीची बागायती झाली आहे. तर उजनी हे पूर्वी जैवविविधतेने नटलेला जलसागर आहे. या जलसागरावर परदेशी पक्षीही विनीच्या हंगामात येतात. त्यामुळे उजनी पक्षीपर्यटनासाठीही प्रसिद्ध होत आहे. उजनीचा गोड्यापाण्यातील मासादेखील प्रसिद्ध आहे. हे सगळे उजनीचे वैभव वाळू उपशामुळे लोप पावताना दिसत आहे. सर्वांवरच याचा परिणाम दिसून येत असल्यामुळे स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. बेसुमार वाळू उपशामुळे धरणातील जैवविविधता संपुष्टात आली आहे, जीवजंतू नामशेष होऊ लागले आहेत. प्रशासनातील आणि राजकीय सहकार्य होत असल्यामुळे तस्काऱ्यांना पाठीशी घातलं जात होतं, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. केली आहे.

Post a comment

0 Comments