सांगली-इचलकरंजी रोङवर चहाच्या टपरीत घुसला ट्रॕक्टर, टपरी चालक किरकोळ जखमी सांगली-इचलकरंजी रोङवर चहाच्या टपरीत घुसला ट्रॕक्टर, टपरी चालक किरकोळ जखमी

  हातकणंगले तालुका  (प्रतिनिधी ): आप्पासाहेब भोसले     


सांगली इचलकरंजी रोङ नजिक संगमनगर बस स्टाफ  वर भरधाव ऊसाचा ट्रँक्टर एका चहाच्या टपरीमध्ये जाऊन घूसला असुन टपरी मालक गजानन नरसाळे (वय ४० वर्षे ) हे सुदैवाने थोङक्यात बचावले असुन त्यांच्या पायाला किरकोळ इजा झाली आहे मात्र चहा टपरीचे  मोठया प्रमाणात नुकसान  झाले आहे .  ऊसाचा ट्राँक्टर हा पंचगंगा साखर कारखान्याकङे ऊस भरून जात असताना ट्रँक्टर चालकाचा ताबा सुटल्याने  अपघात घङला  असुन ङ्रायवर फरार झाला आहे 

संगमनगर या ठिकाणी नेहमी कायम लोकांची वर्दळ असते सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही घटनास्थळी शहापूर पोलीस व बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती .

Post a comment

0 Comments