शिवसैनिक आणि मराठी भाषिकांच्या गनिमी काव्यापुढे निभाव लागणार नसल्याचे पाहून 'करवे'चे गुंड पळून गेले.
 कर्नाटकातील मराठी भाषिक सीमाभागात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनानंतर आज थेट शिवसेना कार्यालयावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या कन्नड रक्षण वेदिकाच्या ( करवे गुंडांना शिवसैनिक आणि मराठी भाषिकांनी पळवून लावले त्यामुळे सीमाभागातआ ता काहीही होऊ शकेल अशी स्फटक परिस्थिती निर्माण झाली  आहे .

आज बेळगावमधील वातावरण गढूळ करण्यासाठी 'करवे'चा म्होरक्या प्रवीण शेट्टी हा शंभर कार्यकर्त्यांसह बेळगावात आला होता.राणी चन्नम्मा चौकात ठिय्या आंदोलन करून पोलिसांना वेठीस धरण्याचा त्याने प्रयत्न केला.

गेल्या वेळी पोलिसांच्या उपस्थितीत करवेच्या गुंडांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे आज केवळ पोलिसांवर विसंबून न राहता, पुनरावृत्तीची शक्यता गृहीत धरून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कार्यालयासमोर जागता पहारा ठेवला होता. शिवसैनिक कार्यालयापासून काही अंतरावर 'जशास तसे' उत्तर देण्यासाठी उभे असल्याचे दिसत होते.

नाहक शिवसेनेला डिवचू पाहणाऱया 'करवे'च्या गुंडांना अद्दल घडविण्यासाठी शिव सैनिकांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. शिवसैनिक आणि मराठी भाषिकांच्या गनिमी काव्यापुढे निभाव लागणार नसल्याचे पाहून 'करवे'चे गुंड पळून गेले. शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहून कानडी पोलिसांनीही शिवसेना कार्यालयाबाहेर संरक्षण दिले.

Post a comment

0 Comments