यळगुडमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, शिबिराचा 127 रुग्णांना झाला लाभ




हातकणंगले : यळगुड (ता. हातकणलंगले) येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त यळगूड व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, राज्यमंत्री नाम. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू विचार मंच व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने झालेल्या आरोग्य   शिबिरात 127  रुग्णांनी  सहभाग नोंदवला.

          कोल्हापूर येथील ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. महापनकर व डॉ. मुल्लाणी यांनी यावेळी रुग्णांना मार्गदर्शन केले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, गुढघा, कंबर दुखी, कॅन्सर उपचार, मुतखडा आदी व्याधींची मोफत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.  

         यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी म्हणाले,  प्रहार संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत. सध्या कोरोना परिस्थितीमुळे व वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक समस्या जाणवत आहेत. आरोग्याविषयी जनजागृती करून सर्वसामान्य, गोर गरीब, गरजू लोकांसाठी चांगली आरोग्य सेवा मिळावी या उद्धेशाने प्रहार संघटना हातकणंगले तालुक्यात आरोग्यसेवेचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

         या शिबिरात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, उपजिल्हाध्यक्ष दगडू माने, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अनिस मुजावर, तालुका सचिव वैभव झुंजार, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा सौ. माधुरी म्हेत्रे,अमोल काळे, अभय शिंदे, अनिल गावडे, इरफान सनदी, शीतल कुर्ले, सचिन कांबळे, भरत शिंदे, सचिन चौगुले, अर्जुन वड्ड, सनी झुंजार, अक्षय वाडकर, सुनील उपाध्ये, फिरोज मुजावर , अमन पटेल , निशिकांत शिंदे,सातगोंडा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post