पद्मजा फिल्म अँन्ड टेलीव्हीजन वेलफेलर अशोशिएशन, सांगोला यांच्या वतीने समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व कोरोना मध्ये प्रामानिक सेवा बजावलेल्या योध्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला..









  इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधनी हॉलमध्ये अध्यक्ष चंद्रकांत आजगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख संयोजक विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच  प्रमुख पाहुणे म्हणून होणेवाडीच्या नुतन सरपंच  सौ.प्रियंका चंद्रकांत आजगेकर, पंचगंगा साखर कारखाना चे चेअरमन पी.एम.पाटील, स्वाभिमानी संघटनेचे नेते जयकुमार कोले, कामगार अधिकारी विजय राजापुरे, 

इस्टेट मॅनेजर इ.न.प. सी.डी.पवार, डॉ.बी.एस.पाटील गडहिंग्लज, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कबनुर बी.जी.देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख कु.तेजश्री पाटील, समाजसेविका कराड सौ.कविता कचरे, समाजसेविका सुमित्रा भोसले, पद्मजा खटावकर अभिनेत्री, सिने अभिनेते मदन पलंगे, जिल्हा सचिव विध्याधर कांबळे, धोंडिबा कुंभार यांच्या हस्ते कोरोनामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक, उधोजक, कला, क्रिडा, साहीत्यीक, अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विलोभनीय हिर्यांना शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानपुर्वक गौरव करण्यात आला.

   त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विक्रम शिंगाडे व पदाधिकारी नेताजी गोरे, अरुन कांबळे, बबन आवळे, प्रशांत कांबळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रिती हट्टीमणी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post