पुस्तक वाचनाने बौद्धिक समृद्धी होते. - कवयित्री सौ. वैशाली नाईकवडी



इचलकरंजी - पुस्तक वाचनाने माणसाची बौद्धिक समृद्धी होते असे मत जेष्ठ कवयित्री सौ. वैशाली नायकवडी यांनी मत व्यक्त केले. श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात संपन्न झालेल्या वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जन्मदिनाच्या निमित्ताने ' मराठी राजभाषा गौरव दिन' प्रसंगी काव्य वाचन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजनश्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय व समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

            प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. नाईकवडी पुढे म्हणाल्या की, सामाजिकता समजण्यासाठी भाषेची गरज असते. भाषा ही माणसाला मिळवावी / शिकावी लागते. यातूनच आपले व्यक्तिमत्व अभिव्यक्त होत असते. माणसाला भाषेतून कोणत्याही भावना योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात, असे म्हणून त्यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले.

             या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील आजी-माजी अनेक विद्यार्थिनीनी  विविध विषयावर काव्य वाचन केले. तसेच मा. श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी 'गझल 'काव्यप्रकाराचे वाचन करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याबरोबर मा. श्री. युवराज मोहिते , मा. श्री राहुल राजापूरे या नवोदित कवींनी स्वलिखित कवितांचे वाचन केले. याप्रसंगी मराठी राजभाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला , निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

              अध्यक्षीय मनोगत डॉ. त्रिशला कदम यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. कदम म्हणाल्या , स्त्री आणि पुरुष ही समानता असली पाहिजे. ही समानता वेगवेगळ्या विषयावर सदर केलेल्या कवींच्या कवितेतून दिसून येते. आपणास उत्तम श्रोता होता आले पाहिजे, तरच आपण लेखन करू शकतो. जे आपण जगतो- अनुभवतो तेच कवी कवितेतून मांडत असतो. म्हणूनच कविता ऐकण्याने डोक्याला झिणझिण्या येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ' वेश्या' या शिर्षकातील  कविता होय.

                या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋतिका हेरवाडे व सौ. मनीषा गवळी यांनी केले. तर आभार कु. प्रियांका शिरोडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सौ. सौदामिनी कुलकर्णी , सौ. संगीता  पाटील, प्रा. व्ही. पी. पाटील , सौ. एकता जाधव, प्रा. वर्षा पोतदार , प्रा. सुधाकर इंडी , श्री विक्रम शिंदे - देसाई आदी प्राध्यापक  सहकारी , प्रशासकीय कर्मचारी व सेवक आणि विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post