तारदाळ येथील वार्ड नंबर दोन मधील सांडपाणी प्रश्न ऐरणीवर...स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष,. भुयारी गटार कामासाठी पाच लाख रुपये मंजूर असून देखील अंतर्गत वादात काम रखडले.




हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

   हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील  वार्ड नंबर दोन मधील  सांडपाणी ची समस्या नित्याचीच बनली असल्याने अनेकदा निवेदन देऊनही   स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी या बाबींकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

     तारदाळ मधील वार्ड नंबर दोन मधील सांडपाणी पाणी बाहेर जाण्यासाठी सध्या कोणताच मार्ग नाही .त्यामुळे संपूर्ण गटारीचे पाणी व सांडपाणी एकत्र गोळा होत तेथील नागरिकांच्या दारात , तसेच रस्तावर साचत आहे .त्यामुळे तेथील परिसरात डासांची उत्पत्ती व भयंकर दुर्गंधी पसरत आहे . या सांडपाण्यातूनच तेथील नागरिकांना ये - जा करावी लागत आहे . याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे .याबाबत संबंधित ग्रामपंचायत ,गटविकास अधिकारी , आरोग्य विभाग हातकणंगले ,आरोग्य विभाग जिल्हा परिषद , तहसीलदार यांना नागरिकांनी वेळोवेळी समस्यांची जाणीव करून दिली पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे . यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . डेंगू ,मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे तरी याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन लक्ष देणार का ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे . लवकरात लवकर  सांडपाणी निचरा होण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात व नागरिकांना होणारा नाहक त्रास दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तेथील नागरिकांनी दिला आला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post