छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा व सुशोभिकरणासाठी निविदा मागवुनच अंतिम निर्णय.
  हुपरी शहरात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तसेच चबुतरा परिसर सुशोभीकरण कामाच्या आराखड्यासंदर्भात वृत्त पत्राद्वारे जाहीर निविदा मागूनच अंतिम निर्णय घेण्याचा तसेच काम दर्जेदार व आदर्शवत करण्याचा निर्धार हुपरी नगरपालिका आणि शिवप्रेमी यांच्या संयुक्त बैठकित घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ जयश्री घाट होत्या हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळा कामासाठी तीस लाख कबुतरा परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी 55 लाख अश्या सुमारे 85 लाखांचा आराखडा पालिकेने मंजूर केला आहे या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून हुले असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती परंतु शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे काम भव्य दिव्य व्हावे या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर मराठा क्रांती मोर्चा मराठा समाज भोई समाज तसेच शिवप्रेमी नागरिक यांनी आज नगराध्यक्षा सौ घाट तसेच स्नेहलता कुंभार यांचे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या अश्वारुढ पुतळ्याचे काम दर्जेदार व आदर्शवत व्हावे तसेच शिवप्रेमींना विश्वासात घेतले पाहिजे या कामाचे वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करून त्यापैकी आलेल्या उत्कृष्ट निविदेची निवड करून काम सुरु करावे असे ठरले यावेळी नगराध्यक्षा सौ घाट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा व कबुतरा व परिसर सुशोभीकरणाच्या निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिल्ली सदर बैठकीस माजी सरपंच दिनकर राव ससे नगरसेवक दौलत पाटील नेताजी निकम जयकुमार माळगे विनायक विभुते भरत मेथे आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments