यड्राव येथील सेव्हन स्टार ग्रुपच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

   


  हातकणंगले तालुका  (प्रतिनिधी- आप्पासाहेब भोसले) 

सेव्हन स्टार ग्रुपने   प्रबोधनाचे  विविध  उपक्रम  राबवून समाजापुढे एक  वेगळा आदर्श उभारला आहे .यासह त्यांचे संघटन व एकजूटी मूळे एकवाक्यता सत्यात उतरली आहे .असे प्रतिपादन सर्व मान्यवरांनी सत्कार समारंभात व्यक्त केले .

          ओंकारेश्वर मंदिर येथे सेव्हन स्टार ग्रुप च्या वतीने आयोजित केला होतां.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश आकिवाटे होते. यावेळी ग्रामपंचायतीचे  सदस्य  रंगराव कांबळे, महेश कुंभार, बाबासो राजमाने, मंगल कांबळे, वैशाली साळुंखे, वंदना कदम, अनिता माने यांचा सत्कार, उद्योजक अनिल स्वामी यांची वीरर्शैव बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ,अखिल भारतीय मानवाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निसारअहमद कडेगावकर तर सचिव आणि प्रसारमाध्यम समन्वयक पदी उदय कुंभार  तसेच यड्राव ग्रामपंचायत नूतन सरपंचपदी कुणालसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

      स्वागत सचिन येलाजा यांनी केले तर प्रास्ताविक घन:शाम कुंभार यांनी केले .याप्रसंगी उपसरपंच प्राची हिंगे व प्रकाश आकिवाट यांनी मनोगत व्यक्त केले . या प्रसंगी विनायक शेट्टी संदीप येलाजा ,प्रदीप हिंगे ,रोहिणी कुंभार ,सरिता शेट्टी ,चैताली मगदूम ,वर्षा येलाजा, सुरेखा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .सूत्रसंचालन भरतेश मगदूम यांनी केले .तर सचिन मगदूम यांनी आभार मानले.

Post a comment

0 Comments