*थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अपना वतन तर्फे " संविधान जनजागृती अभियान "*अपना वतन संघट्नेर्फ़े छत्रपती शिवाजी महाराज , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ,विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत  पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षक , संघटित असंघटित  मजूर ,कामगार , पोलीस प्रशासन ,शेतकरी ,वकील ,विद्यार्थी ,महिला , शासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व सुशिक्षित -अशिक्षित घटकांपर्यंत भारतीय संविधानाची माहिती पोहचवण्याचा अपना वतन संघटनेचा मानस आहे.* त्या नुसार अपना वतन संघटनेच्या वतीने सोमवार दि. २९/०३/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्याना भारताचे संविधान हे सुभाष वारे सरांचे पुस्तक भेटस्वरूपात दिले. त्यावेळी भारतीय संविधानातील काही महत्वाच्या मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

     आज *हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत ,अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ , वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर ,सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे , भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे , दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे ,चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने , देहोराड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे , चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुधाकर काटे , पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे* या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन *" आपले भविष्य भारताचे संविधान "* हे पुस्तक भेट दिले. या वेळी या उपक्रमाचे सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले . यावेळी *अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , युवा रत्न सेवा समितीचे सचिन वाघमारे ,अपना वतन च्या  पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर ,पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख , संपर्कप्रमुख तौफिक पठाण , देहूरोड विभाग अध्यक्ष सद्दाम शेख* आदीजण या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. 


*संविधान_जनजागृती_अभियान*

Post a comment

0 Comments