दानवाड ग्रामपंचायत व राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु.हातकणंगले तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भोसले                     

नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील दानवाड ग्रामपंचायत वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी महामंडळ) यांच्या वतीने 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांना 4000 किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे. *त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेऊन लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना हरिचंद्र कांबळे यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.* यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ.कमल सुखदेव कांबळे यांनी केले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी सह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments