पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल .. उपमुख्यमंत्री अजित पवार

L


पुणे: वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. संबंधीत तरुणीचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू होती. यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाने या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमधील परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातीत राजकीय वातावरण ढवळून निघालंय. तसेच पूजाच्या आत्महत्येशी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा संबंध असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.यावर अजित पवार म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

धनंजय मुंडेंवर ज्यांनी आरोप केला. त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करतेय, असं सांगितलं. नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो. आरोपांच्या खोलात गेलं पाहिजे, अस अजित पवार यांनी म्हटले.

Post a comment

0 Comments