नवे शैक्षणिक धोरण' या विषयावर मा. श्री प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यानइचलकरंजी - येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत 'नवे शैक्षणिक धोरण' या विषयावर मा. श्री प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी श्री कुलकर्णी यांनी मंजूर झालेले नवीन शैक्षणिक धोरण काय आहे ,याविषयी मत व्यक्त केले.  हे सांगत असताना त्यांनी त्या कायद्यातील काही उदाहरणे देऊन योग्य व अयोग्य काय आहे हे सांगितले. कोणतीही चर्चा न होत मंजूर झालेल्या धोरणात अनेक त्रुटी आहेत. ते समाजातील सर्वसामान्य नागरिकांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे आहे. या धोरणाविषयी ज्या ज्या समितीने दुरुस्ती सुचविली होती ती विचारात  न घेता हे धोरण मंजूर झालेले आहे. इतर देश आणि भारत देश यात शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत त्यांनी श्रद्धा आणि विज्ञान हे वेगळे आहे, असे मत मांडले. या धोरणातून विषमता सबलीकरणाचे धोके असल्याची भीती व्यक्त केली. बुद्धांपासून ते संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत एक वेगळी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक परंपरा असल्याचे सांगितले. यातून भविष्यात उच्च शिक्षण फक्त श्रीमंतांसाठी राहील आणि गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल अशी एक भीती व्यक्त केली.

       या कार्यक्रमाचे अध्यक्षीय अनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाणून घेण्याचा हेतू स्पष्ट केला. कालानुरूप माहिती मिळवून अपडेट राहणे हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक यांनी केले, तर आभार डॉ सुभाष जाधव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय कर्मचारी व सेवक मोट्या संख्येने उपस्थित होते. 


--

Post a comment

0 Comments