शिरवळ - खंडाळा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडी सोमवार, दि. 8, मंगळवार, दि. 9 व बुधवार, दि. 10 रोजी होणार .



शिरवळ - खंडाळा तालुक्‍यातील निवडणुका झालेल्या 57 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडी सोमवार, दि. 8, मंगळवार, दि. 9 व बुधवार, दि. 10 रोजी होणार आहेत. तहसीलदार दशरथ काळे यांनी या निवडीचा गावनिहाय कार्यक्रम निश्‍चित केला आहे. त्यानुसार सोमवारी व मंगळवारी प्रत्येकी 21 आणि बुधवारी 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदांच्या निवडी होणार आहेत.

खंडाळा तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आणि मतमोजणी 18 जानेवारीला झाली होती. सरपंचपदांची आरक्षणे दि. 29 रोजी जाहीर झाली होती. त्यामुळे सरपंचपदांच्या निवडी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तहसीलदार दशरथ काळे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमांनुसार सोमवारी (दि. बावडा, पळशी, शिंदेवाडी, झगलवाडी, भादे, हरळी, सांगवी, खेड बुद्रुक, पिसाळवाडी, नायगाव, भाटघर, निंबोडी, मोर्वे, वाण्याचीवाडी, मिरजे, सुखेड, भोळी, बावकलवाडी, विंग, कण्हेरी, अंदोरी, मंगळवारी (दि. 9) पिंपरे बुद्रुक, जवळे, म्हावशी, पारगाव, तोंडल, अजनुज, बोरी, केसुर्ड


धनगरवाडी, वडगाव, कान्हवडी, कोपर्डे, अहिरे, धावडवाडी, अतीट, मरिआईचीवाडी, वाठार बुद्रुक, राजेवाडी, घाटदरे, लोणी, लिंबाचीवाडी, बुधवारी (दि. 10) कवठे, शेडगेवाडी, लोहोम, घाडगेवाडी, अंबारवाडी, कराडवाडी, कर्नवडी, शेखमीरवाडी, गुढाळे, पाडळी, पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी, वाघोशी, शिवाजीनगर, भादवडे या गावांमधील कारभाऱ्यांच्या निवडी होतील.

Post a Comment

Previous Post Next Post