मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू ,तर ,एकजण गंभीर जखमी
शिरोळ : ओंकार पाखरे :

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे घडली आहे. या कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी एका शेतमजूर महिलेलाही ठार केले आहे. अप्पासाहेब अंबुपे (55) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, बंदेनवाज दस्तगीर अपराज हे जखमी झाले आहेत.

दत्तवाड गावात काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी यल्लवा वडार या शेतमजूर महिलेला ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा या मोकाट कुत्र्यांनी त्याच परिसरात अप्पासाहेब अंबुपे या शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर या मोकाट कुत्र्यांनी येथील जनावरांच्या गोठ्यात जाऊन एका म्हशीलाही ठार केले आहे.यानंतर बंदेनवाज अपराज हे त्याच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता, या मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अपराज यांनी आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे मोकाट कुत्रे पळून गेले. या हल्ल्यात अपराज यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments