जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती, बोगस कर्जवाटप, मालमत्ता खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले
सांगली : 
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती, बोगस कर्जवाटप, मालमत्ता खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले असून कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आल्याची माहिती तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली.

  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेमध्ये नोकरभरती, बोगस कर्जवाटप, मालमत्ता खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी केली होता.
  याबाबत फराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याबाबत फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे फराटे यांनी पुणे नाबार्डकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. फराटे यांच्या तक्रारीची दखल घेऊन नाबार्डकडून सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर कार्यालयाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात असणाऱ्या तक्रारीबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात अाले अाहेत, असे तक्रारदार सुनील फराटे यांनी सांिगतले.

    

  कोणतेही पत्र मिळाले नाही : कडू-पाटील

  दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या चौकशीबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कोणतेही पत्र मिळाले नाही, असे स्पष्ट करत अधिक बोलण्यास नकार दिला.

  जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे संयुक्त संचालक मंडळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप पाटील बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्राबल्य आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत कितपत चौकशी आणि कार्यवाही होईल, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  -सुनील फराटे, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, सांगली.

Post a comment

0 Comments