मोकानुसार कारवाई केल्याच्या रागातून महमंदवाडीतील साठेनगरमध्ये 9 वाहनांची तोडफोड पुणे : मोकानुसार कारवाई केल्याच्या रागातून महमंदवाडीतील साठेनगरमध्ये 9 वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाचने 8 जणांना अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्लम पोपट शेख (रा.देवाची उरूळी), स्वप्निल उर्फ रूषभ महेंद्र हिवाळे 24, रा. काळेपडळ, हडपसर), मकदुम फरदीन पटेल (27, रा. देवाची उरूळी), शुभम हरिवंश तिवारी (19, रा. ससाणेनगर, हडपसर), अनिकेत राजु वायदंडे (22, रा. काळेपडळ, हडपसर) आणि ओंकार गोरख वाघमारे (22, रा. काळेपडळ, हडपसर), सुरज त्रिभुवन (20, हडपसर), अमीर असमत शेख (22 ) यांना अटक केली आहे. संतोष नामदेव लोंढे (38) रा.साठेनगर, तरवडेवस्ती, महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

टोळक्याने मोटार, चार रिक्षा, दोन दुचाकी व दोन टमटम वाहनांची तोडफोड केली होती. त्याशिवाय नागरिकांना धमकी देत शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेने ८ जणांना अटक केली आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. तासगांवकर करत आहेत.

Post a comment

0 Comments