रस्ता गेला चोरीला आम.प्रकाश आवाडे यांच्या कडे निवेदन देऊन भागातील नागरिकांनी केली तक्रार

    


(हातकणंगले तालुका प्रतिनिधी -  आप्पासाहेब भोसले)

             तारदाळ येथील तुळजाभवानी नगर येथील आमदार प्रकाश आवाडे  व जिल्हा परिषद सद्यस्य राहुल आवाडे यांना विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले तुळजाभवानी नगर मधील 647 येथील गट क्रमांक मध्ये शहापूर कडे जाणारा रस्ता हा तुळजाभवानी अपारमेंटने व बिल्डरांनी जाणीपूर्वक अतिक्रमण करून रस्ता बंद केलेला आहे. बिल्डराने राजकीय शक्तीचा वापर करून नागरिकासाठी यांना जाणार रस्ता यामध्ये अतिक्रमण करून जबरदस्तीने तो रस्ता बंद केलेला आहे असे नागरिकांनी आमदार आवाडे यांच्याकडे समस्या मांडत त्यावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती केली. त्याचबरोबर तुळजाभवानी नगर मध्ये संपूर्ण भागाचा विरोध असूनही शिवाजी गायकवाड यांच्या घरावर टॉवर उभा केला असून ग्रामपंचायत चा परवानगी नसूनही लोकांचा विरोध डावलून जबरदस्तीने टॉवर उभा करण्यात आला आहे याचीही दखल घ्यावी अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आले त्याचबरोबर तुळजाभवानी नगर हा भाग शेवट येत असल्याने सदर भागांमध्ये कोणतेही काम केले जात नाही या भागांमध्ये रस्ते गटारी तसेच लाईटची सोय नसल्याने या भागांमध्ये आरोग्याचा व रात्री सर्प व मूक जनावरे  फिरत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे यासाठी समस्त नागरिकांनी रस्त्याचा व त्यावर तसेच भागातील सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात असे मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी लवकरच आपल्या भागामध्ये येऊन आपल्या भागातील सर्व समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले

निवेदन देताना यावेळी प्रविण केर्ले,नितिन नेमाने,किरण पवार,अर्जुन करवीरे,अशोक चव्हाण,प्रभाकर ढेरे,रवी नाझरेकर,शुभम शिंदे,संजय मिश्रा,सागर पवार,प्रणव नेमाने,दयानंद गुरव,नितिन विभुते,हनमंता धोत्रे,गगांराम वडर,लालचंन्द्र कुसवाह,मोनेश्वर वडर,सुनील शिंगारे इत्यादी नागरिक  उपस्थित होते

Post a comment

0 Comments