पुणे महापालिकेकडून शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट-बार, हॉल, फूडकोर्ट मध्यरात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगीपुणे – शहरातील व्यावसायिक आस्थापना आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर हॉटेल रात्री 1 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. दरम्यान, महापालिकेकडून 15 फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेकडून न्यू नॉर्मल सुरू होताना शहरातील बंधने हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून महापालिकेकडून शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट-बार, हॉल, फूडकोर्ट मध्यरात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

मद्यविक्री करण्याची वेळही रात्री साडेदहापर्यंत वाढवून दिली असून शहरातील स्पा-सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ खेळाडूंसाठी सुरू असलेले जलतरण तलावही सर्वसामान्यांसाठीही खुले करण्यात आले आहेत. तर शहरातील दुकाने यापूर्वी रात्री 9 पर्यंत सुरू ठेवली जात होती त्या वेळेत वाढ करण्यात आली असून आता दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

महापालिकेने डिसेंबर महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार, या अस्थापना रात्री 11 च्या आत बंद करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र, सुधारीत आदेशाने हॉटेल व्यावसायाला मदत होणार आहे.

सोमवारपासून महाविद्यालये खुली
महापालिका हद्दीतील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे; तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या सोमवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निर्णयानंतर पालिका आयुक्‍तांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालये सुरू करताना महापालिकेने घालून दिलेली

Post a comment

0 Comments