प्रबोधिनीत सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चासत्रइचलकरंजी ता.१२ समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस ज्येष्ठ विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक  कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले आहे. " २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाचे रंगतरंग " या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे.ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात  प्रा.डॉ. विजय ककडे, प्रा. डॉ. राहुल म्होपरे ,प्रा. डॉ. संतोष यादव, प्रा. डॉ.राजू वाईंगडे हे अभ्यासक मांडणी करणार आहेत. सोमवार ता.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे. तरी जिज्ञासू बंधू - भगिनीनी या चर्चासत्रास उपस्थित रहावे. असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments