मांजरी खुर्द गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा प्रकाश सावंत यांची बिनविरोध निवडमांजरी -
 वडगावशेरी विधानसभा मतदार संघात व हवेली तालुक्यात महत्त्वाची समजली जाणाऱ्या मांजरी खुर्द गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा प्रकाश सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व माजी उपसरपंच प्रकाश सावंत, किशोर उंद्रे, विद्यमानसदस्य सिताराम उंद्रे, उत्तम उंद्रे, दिगंबर उंद्रे, बाळासाहेब भोसले, हनुमंत उंद्रे,सोपान पवार, रविंद्र काकडे, आप्पासाहेब माने, ज्ञानेश्वर पवळे, अमित किंडरे, संतोष मुरकुटे, शिलवंत कांबळे, रुपेश उंद्रे,संजय उंद्रे, महेंद्र आदमाने तसेच ग्रामपंचायत सदस्या प्रतिमा उंद्रे, वर्षा उंद्रे, वैशाली काकडे, जयश्री हंकारे आदींसह ग्रामस्थ व सर्व पदाधिकरी उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणारी विकास कामे , प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ मांजरी खुर्द व सुंदर मांजरी खुर्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस नवनिर्वचित उपसरपंच सीमा प्रकाश सावंत यांनी बोलून दाखविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, आमदार सुनिल टिंगरे, जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच सीमा प्रकाश सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments