बॉलिवूड : राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन मुंबई : हिंदी सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.१९८५ मधील वडील आणि दिग्गज चित्रपट निर्माते-अभिनेता राज कपूर यांच्या शेवटच्या दिग्दर्शित चित्रपट राम तेरी गंगा मैलीमध्ये त्यांनी चित्रपटात प्रवेश केला.

चिंपूने आसमान, लव्हर बॉय, जबरदस्त आणि हम तो चाले परदेस यासह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांना १९९० मध्ये रिलीज झालेला झिम्मेदारमध्ये या शेवटच्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला होता. दरम्यान, त्यांच्या जाण्याने अख्खा बॉलिवूड पुन्हा शोकाकुल झाला आहे.


Post a comment

0 Comments