सर्व छोट्या छोट्या जातींना एकत्र करून त्यांना न्याय दिला पाहिजे ...ओ बी सी चे नेते श्री.बालाजी शिंदे




 आनंद शिंदे :

इचलकरंजी :  नुकतीच ओ बी सी चे बैठक सर्किट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती . बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय धोबी समाज चेअरमन बालाजी शिंदे होते . या वेळी बालाजी शिंदे म्हणाले की केंद्र सरकारने 2011साला पासून ज न ग ना केली नाही म्हणून आपल्या ओ बी सी  वर फार मोठा अन्याय झाला आहे त्याचं बरोबर ओ बी सी मध्ये मराठा समाज  आरक्षण मागत आहे त्या मुळे ओ बी सी वर फार मोठा अन्याय होणार आहे आणि फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे म्हणून ओ बी सी नी आता जागरूक झाले पाहिजे. सांगली येथे  महामेळावा आयोजित करण्यात आला आहे तळागाळातील सर्व ओ बी सी महिला पुरुष आणि युवा कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही धोबी समाजा बरोबर व ओ बी सी च्या बरोबर सर्व नेत्यांनी आयुष्य भर आपल्या वेळ दिला आहे म्हणून आपणास माझे विनंती आहे की या मेळाव्यात धोबी समाज बांधव व ओ बी सी बांधव यांनी या सरकारला ताकद दाखवून दिली पाहिजे. महाराष्ट्र मध्ये कै यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर छोट्या छोट्या जातींना न्याय दिला नाही आणि विचार देखील केला नाही हे महाराष्ट्राच दुर्देव म्हणायची वेळ आली आहे. म्हणून आम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने या सरकार मधील मंत्री श्री विजय  वडेटीवार दिसतात आणि ओ बी सी चा बरोबर एक पाऊल पुढे असणारा नेता आहेत आणि वेळ पडली तर आपल्या ओ बी सी  करिता आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणेस मागे हटणार नाही अशी भूमिका घेऊन या छोट्या छोट्या जातींना एकत्र करून त्यांना न्याय दिला पाहिजे असे बालाजी शिंदे यांनी आपले मनोगत म्हणून विचार मांडले .ओ बी सी नेते व कै गोपीनाथ मुंडे यांच्या चळवळीतील व अत्यंत विश्वासातील वंजारी समाजातील कार्यकर्ते श्री विजय कामत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,  महाराष्ट्र मध्ये ओ बी सी वर अन्याय झाला तर अखंड महाराष्ट्र पेटून उठले म्हणून सांगली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महामेळावा मध्ये लाखो संखेने हजर झाले पाहिजे आता नाही तर उद्याच्या काळामध्ये ओ बी सी वर अन्याय होणार आहे म्हणून ओ बी सी आरक्षण मध्ये कोणत्या ही समाजाला घुसखोरी करून देण्याचं नाही या साठी आंदोलन बैठका मोर्चाचे नियोजन वेळ पडली तर आंदोलन करण्याची ओबीसी वाल्यांनी तयारी ठेवावी.अशा पद्धतीने महाराष्ट्र आता पेटून उठला आहे असे आपले विचार मांडले. कोळी समाज युवा नेते शरद कोळी म्हणाली की सर्व ओ बी सी युवकांना माझे विनंती आहे की या महा मेळाव्यात लाखो संखेने युवकांना पुढे आले पाहिजे आणि आपल्या ओ बी सी वर  होणाऱ्या अन्याय बाबत   आवाज उठवला पाहिजे आणि जागरूक झाले पाहिजे. ओ बी सी ची ताकद या महाराष्ट्र सरकारला दाखवून दिले पाहिजे या महाराष्ट्रात आम्ही कमी नाही त्याच्यासाठी आम्हाला वाट्टेल  ती किंमत मोजावी लागेली  तरी चालेल असे विचार मांडले.धोबी समाज च जेष्ठ नेते श्री दत्तात्रेय बन्ने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून या महा मेळावा मध्ये धोबी समाज अग्रेसर असणार आहे त्याच बरोबर  विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव वठारकर व कोर कमिटी चे सागर परीट यांनी कोल्हापूर जिल्हा हजारो कार्यकर्ते अनु असं आभिवचंन दिले .कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री आनंद शिंदे व सांगली जिल्हा अध्यक्ष श्री संताजी शिंदे यांनी मिळून या महा मेळावा स ५१:०००हजार रूपये समाज बांधव यांच्या वतीने देण्यात येणारा आहे असे जाहीर केले कोल्हापूर जिल्हा तून कार्य अध्यक्ष सरदार पवार कोल्हापूर जिल्हा सल्लागार राजाराम रसाळ शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन परीट उपाध्यक्ष मनोहर बन्ने कोल्हापूर जिल्हा संचालक राकेश परीट ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुभाष परिट सांगलीतून विलास गायकवाड महादेव साळुंखे संजय पोवार सुनील सरोळकर अजय सरोळकर  विठ्ठल बन्ने भरत पायेकर विशाल शिंदे सुनील शिंदे व जत तालुक्यातील बरंच पदाधिकारी उपस्थित होते शेवटी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री बन्सीलाल कदम यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post