राज्य सरकार पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या विचारात ..पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यासंदर्भात सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य सरकार पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहेत. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वजेट्टीवर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या सख्येत वाढ होत आहे. नियमांचे पालन करण्याबाबत सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहेत.

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास सरकार नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे. नागरिकांनी करोनाबाबतच्या गाईडलाईन्स पाळाव्यात यासाठी विशेष पथकांची नियक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये, करोनासंदर्भातील गाईडलाईन्सचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, करोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. नागरिकांना कितीही सांगितले तरी ते विनामास्क फिरत आहेत. कुठलीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आता कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मास्क लावणे, गर्दी टाळणे, हे नियम नागरिकांनी पाळावेत.

लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई सुरू केली आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लाॅकडाऊनची वेळ येऊ शकते. असे विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.

संपूर्ण राज्यात एकाचवेळी नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो का? या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, सध्या मुंबईसह इतर सर्व ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. मात्र, संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहता शक्य त्या उपाययोजना राबवा, असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या, संसर्गाचा प्रसार होण्याची गती, बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी या सर्व बाबींचा विचार करून

Post a comment

0 Comments