इंधन दरवाढीविरोधात मनसे मैदानात.



मुंबई – देशात दररोज इंधन दरवाढ होत असून रोज दरवाढीचे नवनवीन विक्रम होत आहे. काँग्रेसने याआधी इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष देखील इंधन दरवाढीविरोधात मैदानात उतरला आहे. मनसेने आपल्या स्टाईलमध्ये केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हा इशारा देण्यात आला. डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डिजेलच्या दरवाढीने ९० रुपयांचा आकडा गाठला आहे. घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधऩाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. २०१४ साली केंद्र सरकारला पेट्रोल डिजेलच्या करापोटी ५३ हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. तरी देखील दरवाढ कमी न करता ती सामान्यांच्या माथी मारली जात असल्याचे मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post