वीज बिल माफ, पोपटपंची कशाला ? निर्णय नाही हातात, कायदा मात्र उशाला



ओंकार पाखरे  :  (शिरोळ तालुका प्रतिनिधी)


 महाराष्ट्र राज्यामध्ये दोनवेळा आपत्ती आली. एकदा महापूर व एकदा कोरोना. महापुराने लोकांचे जनजीवन उध्वस्त करून टाकले.   तर कोरोनाने लोकांचे जगणेच मुश्कील करून टाकले.  यावेळी केवळ लोकांना दिलासा म्हणून व निवडणूकांचा स्वार्थ साधण्यासाठी ज्या-त्या नेत्याने मंत्र्याने वीज-बिल माफीची उद्घोषणा करून टाकली. स्वतःच्या हातात मात्र काहींच नाही. त्या खात्याचा मंत्रीही नाही. तरीही चला वीज बिल माफ. बरं मंत्रिमंडळात जरी मंत्री असला तर ऐकतय कोण? हा त्या खात्याचा मंत्री थोडाच आहे. ज्याच्याकडे खात आहे तो मंत्री या मंत्र्याला किंमत तरी द्यायला पाहिजे. चला आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री आहे लोकांना आश्वासन दिलं आहे त्याच्या शब्दाला कुठेतरी किंमत राहू दे म्हणून थोडं तरी वीज बिल माफ करायचं. यांच्यातीलच राजकारण संपेना. ते जनतेच्या प्रश्नाकडे ...सरकारच्या इभ्रतीकडे   काय डोंबलाच लक्ष देणार. जनता ही खुळी अण्णा, बाबा, दादा, साहेब यांच्यावर खूप विश्वास. पण ह्या विश्वासाला तेंव्हा तडा जातो. जेंव्हा वीजबिल वसुलीला महावितरण चे कर्मचारी वीज-बिल भरा. नाहीतर कनेक्शन कट.,असे म्हणत उशाला येऊन बसतात व ऑनलाइनचा कायदा शिकवतात. मग अण्णा, बाबा, दादा, साहेबांच्या घरावर मोर्चे निघतात. मग हे अण्णा, बाबा, दादा, साहेब - आपल्याला काही माहीतच नाही  असा आव आणतात.

Post a Comment

Previous Post Next Post